आशाताई बच्छाव
जादूटोणा ! पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! जादूटोण्याच्या साहित्यासह ४,४१,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त ! अघोरी प्रकार थांबतील केव्हा?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मोताळा मोताळा तालुक्यातील विज्ञान युगातही जादूटोणा सारखे प्रकार घडत आहेत हे दुदैव म्हणावे लागेल! काल मोताळा तालुक्यातील जयपूर गावामध्ये रात्री १० वाजेच्या सुमारास जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रकार समोर आलाय.
मात्र पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीचा बोराखेडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळी तील ९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अंधश्रध्दा अजूनही बोकळत असून अघोरी प्रकार थांबणार केव्हा? हा चिंतेचा विषय बनला आहे.
मोताळा तालुक्यात असलेल्या जयपूर गावातील राजेंद्र राठी यांच्या शेतातील फार्म हाऊस वरती काल २० मार्च रोजी रात्रीच्या १० वाजेच्या सुमारास जादूटोणा करून पैशांचा पाऊस पडणार असल्याची बोराखेडी पोलिसांनी माहिती मिळाली होती. दरम्यान बोराखेडी पोलिसांनी सापळा रचला. सदर शेतीतील फार्म हाऊसवर जादूटोणाचा प्रकार सुरु होत होता. तंत्र-मंत्र व पूजा करताना टोळी मिळून आली. पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून जादूटोण्यात वापरण्यात येणारे विविध वस्तू, लिंबू मिरची, हळकुंड यासह एक लाल रंगाची मारुती सुझुकी कार (एम एच १४ एच डी ४७९८ क्रमांक) यासह ४,४१,४८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध जादूटोणा कायद्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहेत आरोपी !
या प्रकरणात आरोपी गणेश समाधान मोरे वय वर्ष ३२ रा. उज्जैन मध्य प्रदेश राजेंद्र विठ्ठलदास राठी वय वर्ष ६० रा. जयपूर, नितीन विठ्ठल गायकवाड वय वर्ष २८ रा. पिंपरी चिंचवड पुणे, दीपक सुधाकर सुपे वय वर्ष ४८ रा. बोदवड, अमर रमेश पिंजरकर वय वर्ष ४५ रा. मलकापूर, रत्नदीप माधवराव पाटील वय वर्ष ४५ पिंपरी चिंचवड पुणे, मनोज सुधाकरराव मुधोळकर वय वर्ष ५० रा.
मलकापूर, रमा निलेश आखाडे वय वर्ष २५ रा. निगडी पुणे, कोमल रमेश गायकवाड वय वर्ष २७अजिंठा नगर पिंपरी चिंचवड पुणे इत्यादींचा समावेश आहे.