आशाताई बच्छाव
भोकरदन येथे सामूहिक बलात्कार प्रकरणी तातडीची कारवाई – ३ आरोपी ३ तासांत गजाआड
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 21/03/2025
भोकरदन, २१ मार्च: कठोरा बाजार येथे घडलेल्या एका गंभीर गुन्ह्यात भोकरदन पोलिसांनी अवघ्या तीन तासांत तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रकरणाचा तपशील:
फिर्यादी यांनी २१ मार्च रोजी भोकरदन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, १३ मार्च रोजी त्यांची पत्नी शेतात चुलीसाठी लाकूड गोळा करण्यासाठी गेली असता, आरोपी सद्यामखों अजमेर खॉ पठाण,सादीखों शरीफ खॉ पठाण,फारुख खॉ जिलानीखॉ पठाण (सर्व रा. कठोरा बाजार, ता. भोकरदन) यांनी संगणमत करून तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेदरम्यान, फिर्यादींच्या पुतण्याने पीडितेला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्याला अडवले, त्याचा मोबाईल फोडला आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली.
या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२९/२०२५ नुसार IPC कलम ७० (१), १२६ (२), ३२४ (४), ३९ (२), (३), ३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तीन तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या
महिला अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्याची तातडीने दखल घेत, प्रभारी अधिकारी किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक त्वरित कठोरा बाजार येथे रवाना झाले. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत, पाठलाग करून तिन्ही आरोपींना तीन तासांत अटक केली.
या कामगिरीसाठी पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके, सफौ डी.एन. राऊत, पो.ना. प्रशांत उबाळे, पो.अ. सुरेश बोरमारे, लक्ष्मण रानगोते, के.बी. मोरे, जावेद शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
न्यायालयीन कारवाई आणि पुढील तपास
अटक आरोपींना भोकरदन न्यायालयात हजर केले असता, त्यांना २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके आणि पो.अ. जावेद शेख करीत आहेत.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. गणपत दराडे, पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भोकरदन पोलिसांच्या या वेगवान आणि परिणामकारक तपासामुळे पीडितेला त्वरित न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.