आशाताई बच्छाव
डॉ. सुदाम मुंडे रोड ते जिजामाता उद्यान रोडवरील खड्डे बुजवा – अँड.मनोज संकाये
नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली मागणी!
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि.२२ मार्च २०२५ परळी शहरातील जास्त रहदारी असलेल्या आणि मोंढा मार्केट रोडला जोडणारा डॉ. सुदाम मुंडे रोड ते जिजामाता उद्यान रोडवर खड्डेच खड्डे पडले आहेत त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र नगरपालिकेचे याकडे लक्ष नसून पालिकेचे मुख्याधिकारी साहेबांनी या कामाकडे स्वतः लक्ष देऊन त्वरित या मार्गावरील खड्डे बुजवावीत आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री त्रंबक कांबळे यांच्याकडे केली आहे. डॉ. सुदाम मुंडे रोडवर दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारासाठी तालुक्यातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपली उत्पादने भाजीपाला, फळे घेऊन येतात. लोकांची गर्दी खरेदीसाठी आठवडी बाजारामध्ये याच मार्गावर असते मात्र याच मार्गावर असंख्य खड्डे पडली आहेत त्यामुळे वाहनांना ये जा करण्यासाठी अडथळे निर्माण होतात. वृद्ध नागरिकांना खड्ड्यांमुळे व्यवस्थित चालता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हाच मार्ग जिजामाता उद्यानाकडे जातो त्याची सुद्धा परिस्थिती अशीच आहे त्यामुळे नगरपालिकेचे दक्ष मुख्याधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन या मार्गावरील खड्डे बुजवावेत अशी त्यांनी मागणी केली आहे.