Home उतर महाराष्ट्र खोरी :जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचा शताब्दी महोत्सव महाराष्ट्रातील एक अभिनव उपक्रम

खोरी :जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचा शताब्दी महोत्सव महाराष्ट्रातील एक अभिनव उपक्रम

175
0

आशाताई बच्छाव

1001338104.jpg

खोरी :जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचा शताब्दी महोत्सव महाराष्ट्रातील एक अभिनव उपक्रम

धुळे/नंदुरबार संदीप पाटील ब्युरो चीफ 
दि. १९/०३/२०२५ रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा खोरी ता. साक्री जि. धुळे या शाळेच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्या मूळे शताब्दी महोत्सव कार्यक्रम आयोजिल करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ही सकाळी ८ वा : साक्षरता रॅली ने काढण्यात आली यात शिक्षण,झाडें, पाणी, प्रदूषण या विषय जनजागृती ढोल पथकांच्या घोषणांसह गर्जना करत शालेय विद्यार्थी,गावातील जेष्ठ नागरिक तरुण मित्र मंडळ सहभागी झाले,
साक्षरता रॅली नंतर ज्ञान मंदिराचे प्रशासकीय अधिकारी व गावातून सामाजिक कार्येकर्ते यांच्या हस्ते पूजन करून,
गावातील शिक्षण व विविध क्षेत्रातील नागरिकांचा सेवापूर्ती निमित्त सम्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब पाटील ,,(महाराष्ट्र मजदूर सभा ) व कार्यक्रमाचे प्रमुख पाइणे सालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री राजेंजी पगारे साहेब,निजामपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूरजी भामरे, माळमाथा परीसरात वैदसकीय सेवेत्त अग्रेसर असणारे डॉ. एल, डी. पाटील, यांच्या सह कार्यक्रमात गावातील सहकारी सामाजिक संस्था,विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे लाभले, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षण /समाज / पर्यावरण/जल / रोजगार /यातील मानवातील औपचारिक गुणवत्ता टिकून राहण्याच्या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमांतर्गत माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व स्नेह मिलनाचा आणि स्नेहभोजनाचा सुवर्णयोग आला,
तिसऱ्या सत्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय खोरी यांच्या संयुक्त विद्यमाने वि‌द्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या सर्व कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी खोरी गावातील तमाम नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने देणगी स्वरूपात कार्यक्रमाला शुभेच्छांचा वर्षाव करत जिल्हा परिषद शाळा व शालेय व्यवस्थापन समितीचे मनोबल वाढवून या ज्ञानदानाचे ज्ञान मंदिराचे शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here