आशाताई बच्छाव
वरुड येथे ग्रामीण विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण प्रोत्साहित कार्यक्रम संपन्न
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 20/03/2025
जाफराबाद तालुक्यातील वरुड येथे ग्रामीण विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे प्रोत्साहित करताना जिजाऊ कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वरुड येथे मार्गदर्शन सत्राचे यशस्वी आयोजन केल्याचा आनंद. प्रा. डॉ. राजेंद्र मोरे यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळण्याचे महत्त्व पटवून दिले. जिजामाता ग्रामीण विकास व शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून मी वचन देतो की, नीट/सीईटी तयारीसाठी आवश्यक सर्व सुविधा आम्ही आपल्याच गावात परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देऊ, जेणेकरून ग्रामीण विद्यार्थ्यांना दूरवर जाण्याची गरज पडणार नाही. सरपंच विलास आप्पा शिंदे आणि इतर मान्यवरांसह आम्ही शैक्षणिक संधी आपल्या दारापर्यंत आणण्यासाठी कटिबद्ध आहोत असे आश्वासन दिले.
/ग्रामीणशिक्षण /वैद्यकीयशिक्षण /नीटतयारी /सर्वांसाठीशिक्षण