आशाताई बच्छाव
EXCLUSIVE’हम सुधरेंगे नही!’ रोड रोमियोने केला अल्पवयीन मुलीचा पाठलाग अन्..! -बुलढाण्यातही विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- शेगाव महिला सुरक्षिततेचा मुद्दा एरणीवर आला असताना, जिल्ह्यात एक ना एक घटना महिला सुरक्षिततेचा अभाव अधोरेखित करीत आहे. मात्र पोलीस यंत्रणेला त्याचे सोयरे
सुतक दिसून येत नाही. शेगावात परीक्षेला जाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून लगट साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीवर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदर अल्पवयीन मुलगी शेगाव येथे परीक्षा देण्यासाठी घरून गेली होती. सकाळी दहा वाजता ती शेगावला पोहोचली. दरम्यान बारा वाजेपर्यंत निंबा येथील घरी परत येण्यासाठी बसस्थानकावर येईपर्यंत आरोपी सय्यद अमर सय्यद जावेद (20) राहणार निंबा तालुका बाळापूर याने पायदळ चालत सदर मुलीचा पाठलाग केला. मुलीने मागे वळून पाहिले असता आरोपी सतत तिच्याकडे बघत होता त्यामुळे त्याला घाबरून तिने शेगाव बस स्थानकावर ड्युटीला असलेल्या पोलिसाला याबाबत माहिती कथन केली असता पोलिसांनी आरोपी सय्यद अमर सय्यद जावेदला ताब्यात घेतले.
बुलढाणा शहरात रोडरोमियोचा सुळसुळाट !
काही दिवसांपासून शाळा परिसरारत शाळा, पगहा दिवसापासून रााष्ण परिसरात शाळा,
सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत रोडरोमियोचा सुळसुळाट वाढला असल्याने विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले आहे .. शिट्या वाजवणे, मोटरसायकलीचे हॉर्न वाजवणे, अश्लील हावभाव करणे मुलींची छेड काढणे असे प्रकार करून राजरोसपणे या रोमियोंचे सुरू आहेत यामुळे विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता शाळा परिसरात पोलिस गस्त वाढवून सदर रोमियोंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी समस्त पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.