आशाताई बच्छाव
अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समितीचे राजवड येथील राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न.
राष्ट्रीय उपाध्यक्ष -वसंतराव देशमुख यांच्यासह,प्रदेश कार्याध्यक्ष -मुरलीधर डहाके यांची उपस्थिती
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिंनाक 09/03/2025
महीला दीना निमित्त दिनांक 08/03/2025 शनिवार रोजी राजवड (ता.पारोळा जि.जळगाव) येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला जालना जिल्ह्यातील अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी राजवड येथील राज्यस्तरीय अधिवेशनाला उपस्थीत राहुन सहभाग नोंदवला. तसेच या अधिवेशनाला महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून हजारो पदाधिकारी उपस्थित होते. महीला दीना निमित्त महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा व अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.त्यानतंर राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी बोलतांना सर्व प्रथम महिलांना महीला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महिलांच्या पाठीशी मी आणि अखील भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती खंबिर पणे उभी आहे असे आश्वासन त्यांनी दिले.सर्व उपस्थीत महीला माझ्या मुली आहेत.जर तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्यांना मी आणि आपली संघटना चांगलाच धडा शिकवू असे आश्वासन सुध्दा बाबांनी महीला दीनी दिले .
संघटनेची वाटचाल खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे.भ्रष्ट्राचार, अन्याय, अत्याचार विरूद्ध लढा आणखी तीव्र करण्याची नितांत गरज आहे. कारण हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
तसेच महिला दीना निमित्त सर्व उपस्थीत महिला पदाधिकारी यांचा प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी सामाजिक कार्यासाठी लढणाऱ्या 82 रणरागिणींचा शहीद भगतसिंग वीर योद्धा पुरस्कार आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात केला.
या कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्यातील पदाधिकारी राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष मुरलीधर डहाके, जिल्हा अध्यक्ष कृष्णा लहाने, जिल्हा संघटक अनिस पठाण , जिल्हा अध्यक्ष महिला अघाडी ज्योतीताई बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष शालिकराम आहेर, दीव्यांग जिल्हा अध्यक्ष बबनराव लहाने, जाफराबाद तालुका अध्यक्ष रामदास कदम, भोकरदन तालुका संघटक ज्ञानेश्वर नरवाडे, भोकरदन तालुका अध्यक्ष महीला आघाडी वंदना पाणपाटील,भोकरदन तालुका अध्यक्ष सुनील उंबरकर, या सर्वांची उपस्थिती होती.