आशाताई बच्छाव
चाळीसगावात घरातून 1 लाख 68 हजारांचा ऐवज लंपास
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – घरात घुसून कपाटातील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम 50 हजार रूपये असा 1 लाख 68 हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि 5 मार्च रोजी सकाळी 7 ते दि 6 रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान शहरातील खरजई रोडवरील शिवाजी नगर भागात घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल माधवराव म्हस्के रा शिवाजी नगर, खरजई रोड चाळीसगाव हे दि.5 रोजी सकाळी 7 वाजता ते घराचा पुढचा दरवाजा बंद करून पत्नीसह जळगावी गेले. तर मुले शिकवणीला गेले होते.
6 रोजी सकाळी म्हस्के यांच्या शेजारच्याने त्यांच्या घराचा मागचा दरवाजा बंद असल्याचे व घरातील सामान अस्तव्यस्त असल्याची माहिती दिली असता
म्हस्के यांनी घरी जावून पाहीले तर कपाटात ठेवलेेले 1 लाख 18 हजार रूपये किेमतीचे सोन्याचे दागिणे व 50 हजार रूपये पगारातून जमा करून ठेवलेली रक्कम असा सुमारे 1 लाख 68 हजाराचा ऐवज चोरीस गेल्याचे समोर आले. याप्रकरणी अमोल म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार प्रशांत पाटील हे करीत आहेत.