आशाताई बच्छाव
स्वामी विवेकानंद महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
मुक्रमाबाद प्रतिनिधी /बस्वराज वंटगिरे
मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ८ मार्च२०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन प्राचार्य विवेक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ विलास पवार हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री चंद्रकांत पाटील आणि प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ सूर्यकांत सकनूरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ आर.बी.मादळे यांनी केले.तर प्रास्ताविक डॉ बाविस्कर रवींद्र यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ सूर्यकांत सकनूरे यांनी महिला आणि महिलासंदर्भात असलेल्या कायद्याविषयी उपस्थिताना माहिती दिली. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ विलास पवार यांनी केला. या कार्यक्रमास उपस्थिताचे आभार डॉ आर.बी.बाविस्कर यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बालाजी सादगीरे, गायकवाड संविधान यांनी परिश्रम घेतले .