आशाताई बच्छाव
आंतरराष्ट्रीय महिला दिन व मातांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
दिनांक 8 मार्च रोजी जि. प.कें. प्रा. शाळा केसराळी शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन व मातांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या विद्यार्थि परिषदेने केले होते. सकाळी विद्यार्थिनींनी शाळेच्या परिसरात फुल व रांगोळीची आरास केली.
त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या सरपंच श्रीमती माधुरीताई मनधरने व राजू पाटील मनधरणे तसेच अंगणवाडी ताई यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी गावचे सरपंच यांनी विद्यार्थिनींना संबोधित करताना महिलांच्या सबलीकरणासाठी योग्य ते मार्गदर्शन केले त्यावेळी माता पालकांनीही महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी,शाळेच्या मुख्याध्यापक वाघमारे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षिका व कर्मचारी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देवून कार्यक्रमाचा समारोप केला. महिला सक्षमीकरणाच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला आणि विद्यार्थिनींना भविष्यात आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.
शेवटी सर्व माता पालकांना शैक्षणिक साहित्यरूपी भेटवस्तू देण्यात आली.