आशाताई बच्छाव
उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न .
शस्त्रक्रियेची वार्षिक उद्दिष्ट पूर्ती.
मोतीबिंदूच्या ३०४ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर –राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती नांदेड व उपजिल्हा रुग्णालय देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने देगलूर येथे ३०४ रुग्णावरती नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न.,
वार्षिक उद्दिष्ट(माहे एप्रिल २०२४ ते मार्च २०२५) ३०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया केसेस होते,
दि.०८/०३/२०२५ रोजी १४ रुग्णावरती मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या, वर्षभरामध्ये ३०० केसेसचे उद्दिष्ट आज पूर्ण करण्यात आले, या आर्थिक वर्षामध्ये एकूण ३०४ रुग्णावरती यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या, मागील आठ वर्षापासून बंद असलेल्या नेत्र शस्त्रक्रिया गृह माननीय जिल्हा शल्य चिकित्सक आदरणीय डॉ. निळकंठ भोसीकर सर यांच्या अथक प्रयत्नातून व मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथील देगलूर चे भूमिपुत्र डॉ. नरेश देवणीकर यांच्या पुढाकाराने व देखरेखे खाली चालू करण्यात आली,
डॉ.आपनगिरे वर्ग- १(नेत्ररोग तज्ञ व नेत्र शल्य चिकित्सक), व जिल्हा समन्वयक श्री. चंदनकर साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले, दोन महिन्यापूर्वीच माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्रयत्नातून
उप जिल्हा रुग्णालय देगलूरला डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी नवीन मायक्रोस्कोप व उपकरणे पुरविण्यात आल्या, सदरील शस्त्रक्रिया नेत्ररोग तज्ञ डॉ. सुधाकर तहाडे यांनी केल्या तर सर्व शस्त्रक्रिया शिबिरांच्या यशस्वीतेसाठी भूलतज्ञ डॉ. अनिल धडके,
नेत्र चिकित्साअधिकारी श्री मांजरमकर, श्री कसबे , श्री. शुभम जाधव, अधिपरीचारिका श्रीमती. रेणुका धुमाळे, श्रीमती गोंदे, श्रीमती मोमीन सिस्टर, श्रीमती भंडरवार सिस्टर, श्रीमती कदम सिस्टर, श्रीमती शिरगिरे, श्रीमती ढवळे सिस्टर , श्री. शिवाजी पवार ब्रदर, जमील मामा तसेच रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
येणाऱ्या आर्थिक वर्षा मध्ये (२०२५-२०२६) सर्व गरजू रुग्णांनी, येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांनी जनतेला केले आहे.