आशाताई बच्छाव
उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी केली महादेव मंदिर येथील पाणंद रस्त्याची पाहणी
उदगीर लातुर/प्रतिनिधी
उदगीर शहरा लगत असलेल्या महादेव मंदिर ते देगलूर रोड पर्यंतचा निजामकालीन शासकीय नकाशा वरील पाणंद रस्ता खुला करावा अशी स्थानिक नागरिकांनी गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत,तरीही प्रशासनाने आजपर्यंत पाणंद रस्त्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही,पाणंद रस्त्याच्या चोहोबाजूंनी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घरे बांधून वास्तव्यास आहेत परंतु तेथील नागरिकांना रस्ताच नसल्याने मोठे हाल सोसावे लागत आहे, जळकोट रोड ते महादेव मंदिर पर्यंतचा पाणंद रस्ता खुला करून दिला मात्र महादेव मंदिर ते देगलूर रोड नेहरू नगर पर्यंतचा पाणंद रस्ता आजपर्यंत प्रशासनाने खुला करून दिलेला नाही,महादेव मंदिर ते देगलूर रोड पाणंद रस्ता खुला करून द्यावा अन्यथा उपोषण करण्यात येईल अशी मागणी तेथील रहिवाशांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याने अखेर ७ फेब्रुवारी रोज शुक्रवारी तीन वाजता उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी महादेव मंदिर ते देगलूर रोड जाणाऱ्या पाणंद रस्त्याची प्रत्येक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते, उपजिल्हाधिकारी पाणंद रस्त्या बाबत काय भूमिका घेईल हे पहावे लागणार आहे.