Home भंडारा जीवनबोधी बौद्ध राज्यस्तरीय धम्म रत्न पुरस्काराने सन्मानित

जीवनबोधी बौद्ध राज्यस्तरीय धम्म रत्न पुरस्काराने सन्मानित

71
0

आशाताई बच्छाव

1001285147.jpg

जीवनबोधी बौद्ध राज्यस्तरीय धम्म रत्न पुरस्काराने सन्मानित

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचा पुढाकार

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील शांतीवन बौद्ध विहार चिचाळ येथील संचालक जीवनबोधी बौद्ध (मेश्राम) यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे धम्म ,संत व महापुरुष यांच्या प्रति असलेली आपुलकी व त्यांच्या विचाराची देवाण-घेवाण या शांती वन बुद्ध विहारातून व्हावी याकरिता त्यांनी धम्म ,संत ,महापुरुष यांच्या पुतळ्याची उभारणी करून त्यांचे विचार या शांतीवन विहारातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे व सर्वांकरिता हे शांती बुद्ध विहार मार्गदर्शक ठरावे व त्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी या उद्देशातून त्यांना अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र, मानाचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ व त्यांच्या पत्नी सत्यफुला जीवनबोधी बौद्ध यांचा 11 व्या वर्धापन दिनी शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे सहपत्नीक सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पाठीमागे हात असल्याने त्यांचासुद्धा साडी चोळी व शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जीवनबोधी बौद्ध हे चिचाळ तालुका पवनी जिल्हा भंडारा येथील मूळ रहिवासी असून अत्यंत गरीब परिस्थितीतून आपले उदरनिर्वाह करून व मुलांच्या सांभाळ करून परिस्थिती अत्यंत भयानक असताना अशा परिस्थितीत चिचाळ गाव सोडून ते नागपूर येथे स्थलांतरित झाले व तेथे मिळेल ते काम करून आपला प्रपंच करू लागले. त्यांनी आपल्या दोन मुलांच्या व पत्नीच्या सहकार्याने चिचाळ या ठिकाणी २ एकर जमीन खरेदी करून समाजाचा आपल्याला काही देणं आहे म्हणून त्यांनी विहाराच्या बांधकामा करिता 2007 मध्ये 2 एकर जमीन खरेदी केली. दिनांक 17 मे 2011 ला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी विहाराचे बांधकाम करण्यात आले. शांतीवन बुद्ध विहार हे धम्माचेच केंद्र नसून धम्म चळवळीचे केंद्र आहे .या शांतीवन बुद्ध विहारांमध्ये अनाथ मुलांना आणून त्यांच्या शिक्षण ,जेवणाची ,निवासाची व्यवस्था करण्याचा सुद्धा या संस्थेचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे 28 फरवरी 2015 ला तथागत बुद्धांचे विहार स्थापन केले. विहाराच्या परिसरामध्ये भिक्षु संघ करिता व उपासक संघाकरिता रूम बांधकाम केले .तसेच दिनांक 2/8 /2 2019 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना केली .दिनांक 16 मे 2022 ला शिवली बोधी यांच्या मूर्तीची स्थापना व अशोक स्तंभ स्थापना केली. 26 नोव्हेंबर 2022 ला प्रियदर्शनी सम्राट अशोक यांच्या पूर्णाकृती मूर्तीची स्थापना करण्यात आली .त्याचप्रमाणे 28 फरवरी 2023 ला संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली ..2025 ला सुद्धा तथागत गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सुद्धा 28 फरवरी 2025 ला करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 2026 ला ध्यान साधना शिबिर केंद्र स्थापन होत असून या केंद्रामध्ये 200 उपासक उपाशीका बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.हे करण्यामागे त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसून समाजाच्या हिताकरिता , सुखाकरता आहे. हे सर्व करीत असताना लोक वर्गणीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आपल्या उत्पन्नाचा काही भाग या कामाकरता खर्च करीत आहेत .आज ते सुखाने जीवन जगू शकत होते. परंतु त्यांना धम्माची आवड असल्यामुळे साधी साधी राहणी उच्च विचार या म्हणी प्रमाणे त्यांनी आपल्या धम्माचे कार्य व महापुरुषांचे विचार या शांतीवन विहाराच्या माध्यमातून त्यांनी पुढे नेण्याचा संकल्प केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here