आशाताई बच्छाव
रस्ता अपघातात श्रीराम शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन आर .आर. मठदेवरु यांचे निधन.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर…मूळ मोघा मंडळ मदनुर येथील मूळ रहिवासी व सध्या साधनानगर मध्ये वास्तव्यास असणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवनआप्पा रामलिंगआप्पा मठदेवरु यांचे पुणे सोलापूर महामार्गावर भिगवनजवळ कार अपघातात बुधवारी ता.२६ रोजी पहाटे दुखद निधन झाले .ते पुणे येथील आपल्या मुलाला भेटण्यासाठी सोमवारी पुणे येथे गेले होते. तेथून परत देगलूरकडे येत असताना त्यांच्या कारला एका ट्रकने समोरासमोर जोराची धडक दिली. झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ते श्रीराम शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन होते. व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरंगल येथे पदोन्नत मुख्याध्यापक मधून जुन २०२४ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी ,दोन मुले ,एक मुलगी जावई, नातू ,पणतू असा परिवार आहे. दि.२७ रोजी बुधवारी सायंकाळी ५ ते ६ यादरम्यान त्यांचे साधना नगर येथील निवासस्थानी अंतिमदर्शन घेता येणार आहे. सायंकाळी ६:३० वाजता मोघा मंडळ मदनुर( डोंगळी जिल्हा कामारेडी येथील त्यांच्या शेतात त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार आहेत .ते जिल्हा परिषदेच्या सहशिक्षिका चंद्रकलाबाई मठदेवरु यांचे पती होत.