आशाताई बच्छाव
घानखेडा येथे महाशिवरात्री निमित्त संगमेश्वर महादेव दर्शनाचा शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला
जाफराबाद जालना
प्रतिनिधि – मुरलीधर डहाके
दिनांक 26/20/2025
जाफराबाद तालुक्यातील घानखेडा येथील संगमेश्वर महादेव मंदिर हे जुई नदी आणि केळणा नदी यांच्या संगमावर असल्याने येथे संपर्ण तालुक्यातील तसेच जिल्हा भरातून भविक दर्शनासाठी येतात.
महाशिवरात्री निमित्त संगमेश्वर महादेव संस्थानं येथे ह.भ.प. झगरे गुरुजी महाराज यांचे प्रवचन सुद्धा संपन्न झाले.तसेच महाशिवरात्री संगमेश्वर महादेव दर्शनासाठी तालुक्यातून पुरुष आणि महिला शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.दर्शन घेण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी संगमेश्वर महादेव संस्थानं आणि गावकरी यांनी एका लाईनीत (बारीची) व्यवस्था केली होती. दर्शन झाल्या नंतर लगेच फराळ तयार ठेवण्यात आले होते. येणाऱ्या भाविक भक्तांसाठी घानखेडा येथील गावकऱ्यांनी फराळाची व्यवस्था केली होती. एकही भाविक फरळाविना जाऊ नये म्हणून घनखेडा गावातीली शिवभक्तांनी फराळाचे वाटप केले. पाण्याची सुध्दा चांगली व्यवस्था केली होती. उन्हामुळे सावली साठी मंडप लावण्यात आले होते.
तसेच जाफराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पवार मॅडम आणि त्यांचा स्टॉप यांनी कुठलाच अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.