आशाताई बच्छाव
घानखेडा येथील संगमेश्वर महादेव मंदिरा समोर रांगोळीतून भगवान शंकराचे चित्र
जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील घानखेडा येथील संगमेश्वर महादेव मंदिर समोर महाशिवरात्री चे अवचीत्य साधून जुई – केळना नदी संगमावर माहोरा येथील श्री.गणेश गायकवाड यांची कन्या प्रियंका गायकवाड या मुलीने आपल्या रांगोळी कलेमधून भगवान शंकर महादेवाचे चित्र खूप छान तयार केले होते.शंकराचे रांगोळीतून तयार केलेले चित्र पाहण्यासाठी भाविकांनी सुद्धा खूप मोठी गर्दी केली होती .तिच्या या कलेची सर्व स्तरातून तसेच घानखेडा माहोरा या गावामधून तीचे कौतुक होत आहे तसेच अभिनंदनचा वर्षात सुद्धा होत आहे. बऱ्याच शिवभक्तांनी तीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.