आशाताई बच्छाव
पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांची गोंदी पोलीस ठाण्याची वार्षिक पाहणी
जाफराबाद जालना प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 25/02/2025
दि.२४फेब्रुवारी रोजी गोंदी पोलीस स्टेशन येथे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री वीरेंद्र मिश्र यांनी वार्षिक तपासणी कामी भेट दिली. भेटीमध्ये गोंदि पोलिसांची मानवंदना स्वीकारून गोंदी पोलिसांच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा, तसेच पोलीस स्टेशन नी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत गोंदी पोलिसांचे कौतुक केले तसेच सर्व पोलीस अंमलदार यांच्याशी सैनिक संमेलनातून संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच संपूर्ण इमारतीची परिसराची व पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या सर्व रेकॉर्डची पाहणी केली. वार्षिक तपासणी दरम्यान जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड श्री विशाल खांबे, गोंदी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष खांडेकर. उप निरीक्षक इब्राहिम शेख.व गोंदी पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ हजर होता. तपासणी दरम्यान माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांच्याशी संवाद साधला व त्यांनी प्रथम फेस फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना मिळून दिलेल्या रोजगाराचे अनुषंगाने केलेल्या कामगिरीचे देखील कौतुक केले.