आशाताई बच्छाव
चाळीसगाव येथे हॉटेल मधून गावठी पिस्टल व काडतूस सह एकास अटक
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- शहरातील स्टेशन रोडवरील एका हॉटेल मध्ये बसलेल्या राहता तालुक्यातील 21 वर्षीय तरुणास चाळीसगाव शहर पोलिसांनी गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतूस सह ताब्यात घेतले असून त्याचे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील हॉटेल विराम परमिटरूम बार मध्ये एक तरुण गावठी पिस्टल घेवून बसला असल्याची गोपनीय माहिती गस्तीवर असलेले उपनिरीक्षक संदीप घुले यांना मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सोबतच गस्तीवर असलेले
पोहेकॉ. योगेश बेलदार, राकेश पाटील, अजय पाटील, पोलीस नाईक नितीन आगोणे व पोकॉ. निलेश पाटील यांनी दि 24/2/25 रोजी दुपारी हॉटेल मध्ये जाऊन सापळा रचून त्यास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव किरण कैलास गायकवाड (वय-21 वर्षे, मुळ राहणार – संवसर, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर, सध्या – शिर्डी बायपास, खंडोबा मंदिर जवळ, ता. राहता, जि. अहिल्यानगर) असे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून 32 हजार रुपये किमतीची 1 गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतूस हस्तगत करून त्यास ताब्यात घेतले असून त्याचे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 58/2025 अन्वये भारतीय हत्यार प्रतिबंध कायदा कलम 3, 7 व 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.