आशाताई बच्छाव
नांदेड जिल्ह्यात ज्ञान गंगा व जगण्याचा मार्ग पुस्तकाचे वितरण
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड –संत रामपाल जी महाराज यांच्या ‘ज्ञान गंगा’ या आध्यात्मिक ग्रंथाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना खऱ्या गुरुची ओळख मिळाली असून, अध्यात्मिक ज्ञानाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये या ग्रंथाची सेवा करण्यात आली असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
‘ज्ञान गंगा’ ग्रंथाचे विशेषत्व या ग्रंथात संत रामपाल जी महाराज यांनी वेद, गीता, उपनिषदे, पुराणे, गुरुग्रंथ आणि कुराण शरीफ यांच्या आधारे मोक्षाचा खरा मार्ग स्पष्ट केला आहे. या ग्रंथाच्या वाचनाने लोकांना समजले की, सत्य मार्गासाठी खरा गुरु आवश्यक असतो, जो शास्त्रानुसार मार्गदर्शन करतो. अनेक भक्तांनी यानंतर खऱ्या संताची ओळख पटवून त्यांच्याकडून निर्मल भक्ति स्वीकारण्याचा संकल्प केला आहे.
ग्रंथ सेवेला मोठा प्रतिसाद
या ग्रंथाचे नांदेड आणि अनेक गावांमध्ये वितरण करण्यात आले. मोठ्या संख्येने लोक या ग्रंथाची मागणी करत असून, त्यांना यातून अंधश्रद्धा, कर्मकांड, दिखाऊ भक्ति आणि चुकीच्या धार्मिक धारणांपासून मुक्ती मिळत आहे. सत्यज्ञानाची वाटचाल सुरू‘ज्ञान गंगा’ ग्रंथाच्या माध्यमातून लोकांना जीवनाचा खरा उद्देश समजत असून, शांती आणि भक्ति मार्गाकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे. हा ग्रंथ वाचण्यासाठी इच्छुक नागरिकांनी स्थानिक स्वयंसेवकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संत रामपाल जी महाराज यांच्या शिकवणुकीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहेत आणि हे ग्रंथ वितरण सेवा त्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.