Home नांदेड युवकांनी नेत्रदानाच्या संकल्पातून सामाजिक बांधीलकी जोपासावी-प्रा. डॉ. बालाजी कतूरवार

युवकांनी नेत्रदानाच्या संकल्पातून सामाजिक बांधीलकी जोपासावी-प्रा. डॉ. बालाजी कतूरवार

26
0

आशाताई बच्छाव

1001270613.jpg

युवकांनी नेत्रदानाच्या संकल्पातून सामाजिक बांधीलकी जोपासावी-प्रा. डॉ. बालाजी कतूरवार

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

देगलूर –भारतीय समाज व्यवस्थेमध्ये व संस्कृतीमध्ये दानाला फार मोठी परंपरा असून इतर कोणत्याही दानापेक्षा नेत्रदान, रक्तदान आणि देहदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, असे प्रतिपादन देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख तथा रुग्ण सेवा मंडळाचे सहसचिव प्रा.डॉ. बी. आर. कतूरवार यांनी व्यक्त केले.
देगलूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेत्रदान ,रक्तदान व अवयवदान याविषयावर जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संजय देबडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकप्रशासन विभाग प्रमुख तथा रुग्ण सेवा मंडळाचे सहसचिव डॉ. बालाजी कत्तुरवार हे होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. कत्तुरवार यांना स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. व्यंकट खंदकुरे यांनी केले.
डॉ. कत्तुरवार यांनी विद्यार्थ्यांना नेत्रदान, रक्तदान याबद्दल ची माहिती देऊन त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच इतर दानापेक्षा नेत्रदान ,रक्तदान किती श्रेष्ठ दान आहे, हे सांगितले आणि रक्तदान, नेत्रदान बद्दलचे विद्यार्थ्यांचे गैरसमज दूर केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. संजय देबडे यांनी नेत्रदान, रक्तदान ही काळाची गरज असल्याचे सांगून नेत्रदान व रक्तदान करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश क्यादारे यांनी केले तर आभार डॉ.व्यंकट खंदकुरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सुरेश काशिदे यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी २३ प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला.सदरील कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ ए. बी. चिद्रावार, कार्यालय अधिक्षक गोविंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

Previous articleउदगीर शहरात सुरु असलेल्या अंडरग्राउंड ड्रेनेज काम थांबवा अन्यथा रास्ता रोको आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
Next articleनांदेड जिल्ह्यात ज्ञान गंगा व जगण्याचा मार्ग पुस्तकाचे वितरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here