आशाताई बच्छाव
आदर्श स्काऊटर पुरस्कृत केशवराव सूर्यवंशी यांचा अमृत महोत्सव संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी): स्थानिक न्यू फ्रेंड्स कॉलनी येथील रहिवासी श्री. के. एम. सूर्यवंशी सर यांनी वयाची 75वी गाठली असून त्यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम दिनांक 19/02/2025 ला संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.विठोबा भगत स्काऊटर गोंदिया हे होते तर प्रमुख अतिथी श्री.रोंगें सर माजी मुख्यध्यापक, तसेच श्री.अंकुश हलमारे, श्री.गणेश सारवे, श्री. भिष्मा टेंभुर्णे, श्री.हिरालाल लांजेवार, श्री.प्रमोद मुंडले, जवाहर सूर्यवंशी, ललित सूर्यवंशी, किशोर पेठकर, प्रणित उके सर भंडारा यांच्या उपस्थितीत पार पडला.
केशवराव सूर्यवंशी यांच्या सेवा काळातील अनेक आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते, आपले अनुभव त्यांनी प्रत्यक्षपणे व्यक्त केले, वेगवेगळ्या पदावर असलेले त्यांचे विद्यार्थी व सेवा काळातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भंडारा स्काऊट मित्रपरिवार यांच्या वतीने सूर्यवंशी दांपत्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. शाल श्रीफळ व मोमेंटम देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कहालकर दुःखनिवारक केंद्र भंडाराचे डॉ.अक्षय कहालकर यांनी भेटवस्तू व शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता. सर्व मान्यवरांनी त्यांच्याबद्दल असलेले गोड संबंध व आपल्या प्रति असलेल्या भावना शब्दातून व्यक्त केले.
दुसऱ्या दिवशी प्रगट दिनाचे औचित्य साधून दही काल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ह.भ.प. कृष्णानंद चेटुले महाराज यांच्या कीर्तन व हरीपाठाने कार्यक्रमाला रंगत आली. तसेच दोन्ही दिवशी सायंकाळला महाप्रसाद वितरण करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आश्विन खांडेकर व आभार सुषमा लांजेवार मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ललित सुर्यवंशी, जवाहर सुर्यवंशी, जावई लांजेवार, प्रणित उके व इतर मंडळींनी मेहनत घेतली.