आशाताई बच्छाव
भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष भाऊ दानवे यांची पंचायतराज कमिटीचे अध्यक्षपदी निवड
युवा मराठा न्यूज नेटवर्क भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भोकरदन भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार संतोष भाऊ रावसाहेब पाटील जी दानवे यांची पंचायतराज कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांच्या निवडीबद्दल पारद बुद्रुक येथील माजी सभापती श्री परमेश्वर पाटील लोखंडे व गणेश शिवराम लोखंडे पवन गुलाबराव देवेंद्र लोखंडे संजय पाटील लोखंडे यांनी गुलालाची उधळण करून व फटाक्यांचे अतिश बाजी करून या निवडीचे स्वागत केले आहे परमेश्वर पाटील लोखंडे यांच्याशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी श्री संतोष पाटील दानवे यांच्या निवडीबद्दल दोन शब्दात आपल्या भावना व्यक्त केलेले आहे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून लाडकं नेतृत्व या आमच्या तालुक्याला लाभलेला आहे आणि या लाडक्या नेतृत्वाला आज पंचायत राज कमिटीच्या अध्यक्ष रूपाने सर्वसामान्यांची कामे असो व राज्यातील कामे असो करण्याची एक सुवर्णसंधी आज आमच्या नेतृत्वाला मिळालेली आहे.