आशाताई बच्छाव
आई नावाच्या पहिल्या संस्कार विद्यापीठाला जपा – प्राध्यापक डॉ.रामकृष्ण बदने.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
बिलोली– आई वात्सल्याचा सागर आहे.आई वडिलांच्या सेवेत खऱ्या अर्थाने स्वर्ग आहे.सामान्य माणसाबरोबरचं संत व महापुरुषांच्या जडणघडणीत आईचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे.शाळेतून आपण शिक्षण घेत असलो, तरी लहानपणी शिस्त लावण्याचे काम आई वडील करीत असतात. एका अर्थाने संस्काराचा पहिला वर्ग आईचं आहे,हे विसरून चालणार नाही.जगातील अनेक महापुरूषांना घडविण्यात आईचा सिंहाचा वाटा आहे.मला घडविण्यात माझ्या आईचा सिंहाचा वाटा आहे.अत्यंत गरीबीतुन,अडचणीतून माझ्यावर जे तीने शिक्षणाचे संस्कार केले त्यामुळेच मी इथपर्यंत पोहचलो.कार्यक्रमाचे संयोजक माझे मित्र प्रा.डाॅ.हणमंत लाकडे यांनी आपल्या आईच्या नावे अनेक वर्ष व्याख्यानमाला चालवली आहे.त्या व्याख्यानमालेत वीस वर्षापुर्वी याच विषयावर इथे बोलायला आलो होतो.सर माता आणी मातेवर प्रेम करणारे आहेत.त्यांच्या वाचनालयाने हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.आज आपण आई वडीलांना विसरायला लागलो आहोत.वृध्दाश्रमाची संख्या वाढत आहे.श्रावणबाळ योजना आली आहे.या वेळी आईवरील व्याख्यान ऐकताना अनेक श्रोते भावुक झाले.आपल्यावर सर्व प्रथम संस्कार करणा-या आई नावाच्या पहिल्या संस्कार विद्यापीठाला जपा असे प्रतिपादन ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान)महाविद्यालय,वसंतनगर ता.मुखेड जि.नांदेड येथील प्रसिद्ध वक्ते डॉ.रामकृष्ण बदने यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महात्मा बसवेश्वर सार्वजनीक वाचनालय आरळी ता.बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने बहि:शाल व्याख्यानमालेचे प्रथम व्याख्यानपुष्पाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहशिक्षक दत्तराम बोडके हे होते.त्यांनी या वेळी हिरकणी या आईचे उदाहरण दिले.तसेच आई वडील आहेत तो पर्यंतच घराला घरपण असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा वाचनालयाचे अध्यक्ष व देगलूर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ.हणमंत लाकडे यांनी करताना सांगितले की
समाजात मूल्य विचार रूजावेत. महामानवांच्या विचाराचा जागर व्हावा,या उद्देशाने सदरील व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यापीठाला वाटते की शाळा व महाविद्यालय याच्या बाहेर विविध प्रश्नांवर विचार मंथन घडावे हा या व्याख्यानमाले पाठीमागचा उद्देश आहे.वेदांत लाकडे यांनी प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय करून दिला.
पुढे बोलताना डॉ.बदने म्हणाले, आईसमोर नतमस्तक झाल्यास कधीच अपयश येणार नाही. उपनिषदापासून तर अलीकडच्या एकविसाव्या शतकातील सगळ्यात साहित्यिकांनी आईविषयी भरभरून लिहिलेले आहे. असे सांगत त्यांनी संत ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा तसेच प्रासंगिकता लक्षात घेऊन अनेक उदाहरणे देत श्रोत्यांना अंतर्मुख केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री संजय स्वामी यांनी केले तर आभार श्रीनाथ पोतदार यांनी मानले.
या वेळी आरळी गावचे नुतन पोलीस पाटील आकाश मरखेले,नुतन कोतावाल शेख अखील गौस यांचा व सी.आर.पी.एफ.मध्ये नियूक्ती झाल्याबद्दल शेख अल्ताफ लतीफ या सर्वांचा वाचनालयाच्या वतीने सत्कार संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थाचालक हजप्पा पाटील सूंकलोड,शंकरराव पांचाळ,हाणमंतराव याबाजी,रमेश पोतदार गावातील अन्य नागरिक व महिला उपस्थित होते.