आशाताई बच्छाव
मन शांत झाल्याशिवाय बुद्धी विलक्षण होत नाही.
प्रा.अण्णाराव मुंढे
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मंदिर परिसर हा आपल्या मनातील सगळे विचार विसरायला लावतो,तर घरातील परिसर हा कामाची आठवण करून देणारा असतो.त्यामुळे घरात ,शेतात ध्यानाला बसले असता अर्धवट राहिलेली कामे आठवणीत आल्यामुळे ध्यान धारणेत किंवा नाम साधने विघ्न येऊन साधना अपूर्ण राहते. नाम साधणेसाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा जितकी मंदिरात जास्त असते तितकी घरात किंवा शेतात नसते. मंदिरात गेल्यानंतर मन शांतीसाठी देवाकडे काहीही मागू नका. संसारिक सुख मागण्यासाठी मंदिरात गेल्यावर तिथे कधीच सुख मिळत नाही. कारण घरातील सर्व वस्तू विनाशी असतात. विनाशी वस्तूचा नाश झाल्यानंतर दु:खाची प्राप्ती होते.परमात्मा अविनाशी असल्यामुळे तिथे अविनाशी तत्वच मागावे.मंदिरात अविनाशी परमतत्वाशी एकरूप एकरस होताना तेथील धूप,दिप, गंध,वातावरण,कीर्तन,भजन, नामस्मरण या तल्लीन होऊन गेल्यास आपोआपच आपणास मन शांती प्राप्त होते. मन शांत झाल्याशिवाय बुद्धी विलक्षण होत नाही.म्हणून मनशांतीसाठी मंदिरातच गेले पाहिजे असे मत प्रतिपादन मुखेड येथील विचारवंत सद्गुरू श्री. ह.भ.प.प्रा.अण्णाराव मुंढे महाराज यांनी केली,ते कंधार पासून जवळ फकीरद-याची वाढी येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सहाव्या दिवशी दुपारी प्रवचनात म्हणाले. पुढे बोलताना ह.भ.प.प्रा.श्री.अण्णाराव मुंढे महाराज म्हणाले की मंदिरात गेल्यावर मंदिरात लावलेल्या दिव्याला देवासमोर तेवताना समई वरील प्रकाशात भगवंताच्या मूर्तीला प्रेमाने पहा संतोषामृततृप्त मनाची एकाग्रता करून तल्लीन होऊन भगवंताच्या मूर्तीकडे एकटक लावून पहा चेहऱ्यावरती वेगवेगळ्या छटा हालचालीचा अनुभव घेता येईल. सर्व काही क्षणभरासाठी विसरेल आपण कोठे आहोत हे आठवतच नाही. परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असता अवांतर गोष्टीचा परिणाम मनावर होत नाही. मंदिरात आल्यावर सर्वस्वी भार देवावरच असतो. मंदिरात भगवंताच्या नामामुळे भगवंताचे स्मरण होते. तपस्याचे फळ काहीही असो अनन्य भावनेने भगवंताला शरण जाण्याची बुद्धी घरात बसून घेऊच शकत नाही ती केवळ मंदिरात जाऊन भगवंताच्या नामस्मरणाने प्राप्त होत असते. भगवंताला अनन्य भावनांनी शरण जाणे यापेक्षा परमश्रेष्ठ गती दुसरी नाही. भगवंताची शरणागती जेवढी झेपेल तेवढीच करावी. सर्वस्वीभार भगवंतावर सोपवून निवांत राहिल्यास मनाचे स्वास्थ्य बिघडत नाही. जमा करून ठेवायचेच असेल तर आशीर्वाद जतन करून ठेवा तळतळात नाही. कारण धनसंपत्ती सोबत येत नाही, तर तळतळाट सुखाने जगु देत नाही. जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवा मनाप्रमाणे झाले तर भगवंताची कृपा समजा. मनाविरुद्ध झाली तर भगवंताची इच्छा समजा .स्वतःची कामे पूर्ण क्षमतेने करा, दुसऱ्याच्या अधिकाराचे रक्षण करा आपल्याला नक्कीच समाधान मिळेल असे म्हणाले. प्रस्तुत प्रवचनासाठी परिसरातील भावीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी पसायदानाने प्रवचनाची सांगता करण्यात आली.