आशाताई बच्छाव
उंद्री प. दे. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ वी जयंती उंद्री प.दे. ता. मुखेड येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात गावातील ज्येष्ठ नागरिक सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन माधवराव पाटील वडजे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली.तर सरपंच वनिताताई गनलेवार यांच्या हस्ते नियोजित पुतळ्याच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. उंद्री प.दे.येथील पोलीस पाटील प्रतिनिधी विजयकुमार वादे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. नारायण पाटील वडजे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर गावातून ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जाहुर बिटचे बालाजी तेलंगे साहेब, कोकने साहेब यांच्यासह उपस्थित पोलीस कर्मचारी बांधव यांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवजन्मोत्सव कार्यक्रम सोहळा व मिरवणूक यशस्वीरित्या नियोजनबद्ध पार पाडून चांगल्या रितीने सहकार्य केल्यामुळे तेलंगे साहेब यांच्या हस्ते शिवजयंतीचे अध्यक्ष अजित मनोज बिरादार यांचे कौतुक करून सत्कार करण्यात आला.यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांसह शेकडो शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.