आशाताई बच्छाव
माहोरा येथील रेणुका माता मंदिरास योगेश लोळगे यांच्याकडून बोरवेलची देणगी
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 23/02/2025
सविस्तर वृत्त असे की चिखली येथील प्रसिद्ध व्यापारी व समाजसेवी योगेश लोळगे यांनी माहोरा येथील रेणुका माता मंदिरास बोरवेलची देणगी दिली आहे. या बोरवेलमुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे. योगेश लोळगे हे समाजहिताच्या कामांसाठी ओळखले जातात आणि त्यांनी आपल्या या देणगीद्वारे पुन्हा एकदा समाजातील जनतेच्या हिताचा विचार केला आहे.
मंदिराच्या अध्यक्ष डॉ. रवींद्र कासोद यांनी योगेश लोळगे यांचे आभार मानून ही देणगी भाविकांच्या सेवेसाठी वापरली जाईल असे सांगितले. ग्रामस्थ आणि भाविकांनीही या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या उपक्रमामुळे मंदिर परिसरातील पाण्याच्या समस्येचे निराकरण होऊन भाविकांना मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. बोरवेलची मशीन सुरू करतांना या वेळी रामधन मामा कासोद,डॉ.कासोद साहेब,सुभाषराव जाधव,समाधान मुठ्ठे,रमेश कासोद,मुरलीधर डहाके, दीपक बोरसे, भगवान लहाने, रामेश्वर शेळके,वामन लहाने,ढवळे,सांडू अण्णा कासोद आदीस गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.