आशाताई बच्छाव
डोंगरगाव येथे खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न..!
सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या हस्ते मूर्ती स्थापना.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड:- तालुक्यातील डोंगरगाव येथील कुलदैवत खंडोबा मंदिराचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. दि. 21 फेब्रुवारी रोजी शुक्रवार सकाळी 12.30 वाजता या मंदिरात खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न झाला आहे. यावेळी भजनी मंडळींनी मोठ्या थाटात टाळ मृदंग वीणा वाजत गाजत मोठ्या उत्साहात महिलांनी सुद्धा सहभागी झाले होते यावेळी पावले, फुगडी खेळत उत्सव साजरा केला.या कार्यक्रमाला गावातील सर्व नागकांनी उपस्थिती राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे, खंडोबा प्रतिष्ठान ट्रस्टीच्या वतीने व संमत गावकऱ्यांच्या वतीने दि. २१ शुक्रवार रोजी दुपारी ०२ वा. महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा डोंगरगाव येथे शुक्रवार सकाळी 12.30 वाजता खंडोबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळस बसविण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर लगेचच सर्व नागरिकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले.
सायंकाळी 4 वाजता व्याख्यानाचा, कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच संध्याकाळी महाराज वाघे धानोरकर व त्यांचा संच खंडोबा मंदिर येथे जागरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या वेळी गावातील मोठ्या प्रमाणात भाविकांची अलोट गर्दी होती या वेळी गावातील व बाहेर गावाहून आलेल्या महिलांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती भव्य दिव्य असा डोंगरगाव येथील खंडोबा मूर्ती प्रतिष्ठान सोहळा संपन्न झाला आहे.
यावेळी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.