आशाताई बच्छाव
छत्रपतींचे विचार आत्मसात करून आचरण करणे काळाची गरज -पत्रकार संदिप जाधव
युवकांना छत्रपतींचा खरा इतिहास कळणे काळाची गरज – पत्रकार संदिप जाधव.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या थोर शिवाजी महाराजांचे विचार आचार हे संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी वंदनीय असून त्यांनी कधीही भेदभाव केलेला नाही.त्यांच्या विचारांचा अंगिकार करून प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पत्रकार संदिप जाधव यांनी केले.
छत्रपती भोसले राजे प्रतिष्ठान व भाजप उद्योग आघाडी यांच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमात छत्रपतींचे विचार समाजात रुजवण्यासाठी १००० शिवमूर्त्यांचे वाटपही करण्यात आले. यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे अनावरणही करण्यात आले. याचबरोबर येथे गरजूंसाठी मोफत आरोग्य शिबिरही जयंतीनिमित्त राबवण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भाजप उद्योग आघाडीच्या सरचिटणीस श्रध्दाताई कंडूडे
उद्घाटक म्हणून शिवसेना नेते दिनेशजी मालपे उद्योजक प्रतापराव साळुंखे, लोकशाही परिवाराचे भागवतजी वैद्य व.नांदेड जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ शिनगारे. इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना पत्रकार संदिप जाधव म्हणाले, अखंड भारतात असा जाणता राजा महाराष्ट्राने दिला. त्यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर अनेक गड किल्ले ताब्यात घेऊन गनिमी काव्याने औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला धूळ चारली त्यांचे विचार अंगीकार करून आचरण करावे असे आवाहन पत्रकार जाधव यांनी यावेळी बोलताना केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती भोसले राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण भोसले,बालाजी सूर्यवंशी, मनमोहन तोमर, व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले.