आशाताई बच्छाव
रस्त्यावर बाईकने कट मारल्याने बाचाबाची, गजा मारणे गँगची मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारहाण, तिघांना अटक, मारणेचा भाचा फरार
पुणे: (कोथरूड)केंद्रीय नागरी उद्यान मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या व्यक्तीला गुंड गजानन मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोथरूड भागात गाडीचा धक्का लागल्याने वाद झाला आणि त्यातून आय टी इंजिनियर असलेल्या देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली आहे. देवेंद्र जोग शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला बुधवारी दुपारी कोथरूड भागातील भेलके नगर परिसरातून दुचाकीवरून निघाले असता गजानन मारणे टोळीतील बाबू पवार, किरण पडवळ, ओम तीर्थराम आणि अमोल तापकीर या चौघांनी गाडीचा धक्का लागला असं म्हणून जोग यांना बेदम मारहाण केली. ज्यामध्ये जोग यांच्या नाकाला नाकाला गंभीर दुखापत झाली असून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मोहोळ यांनी व्हिडीओ कॉलवरून देवेंद्र जोग यांची केली विचारपूस
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्हिडीओ कॉल करून देवेंद्र जोग यांची विचारपूस केली असल्याची माहिती आहे. देवेंद्र जोग हे मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्क कार्यालयात सोशल मीडिया कॅम्पेनिंगच्या कामात मदत करतात. पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून चौथा बाबू पवार हा फरार झाला आहे. बाबू पवार हा गुंड गजानन मारणेचा भाचा आहे. कोथरूड परिसरात यामुळे भीतीचे वातावरण आहे.
नेमकं काय घडलं?
शिवजयंतीच्या दिवशी (19 फेब्रुवारी) कोथरूड परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती. त्यावेळी चार जणांनी बाईकवरुन जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना कट मारला. त्यावेळी त्या चार जणांकडे देवेंद्र जोग रागाने बघितलं म्हणून तेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या चौघांनी मिळून देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरोधात BNS कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी हळू चालवता येत नाही का, धक्का का दिला,’ असे म्हणून टोळक्याने जोग यांना मारहाण केली. एकाने तरुणाच्या नाकावरजोराने ठोसा मारला. त्यानंतर त्याला रस्त्यावर पाडून लाथा-बुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. मारहाण करून टोळक्याने तेथून पळ काढला. तक्रारदाराने स्वतःला सावरत वडिलांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि ते दोघे कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. तीन आरोपींना कोथरूड पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. तर एक आरोपी, जो गुंड गज्या मारणेचा भाचा आहे, तो फरार आहे.हे चौघेजण कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या टोळीतील आहेत.अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ, आणि बाबू पवार (गजाचा भाचा) असे आरोपींचे नाव आहेत. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.