आशाताई बच्छाव
अवैधरित्या वाळूची (गौण खनिजाची) चोरटी वाहतूक करणारे आरोपी 15,13,000/.रुपयाच्या मुद्देमालासह जेरबंद मौजपुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई.
जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 21/02/2025
सविस्तर वृत्त असेही जालना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ईसमांवर कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक श्री.अजय कुमार बंसल साहेब यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस ठाणे मौजपुरीचे प्रभारी सपोनि.श्री.मिथुन घुगे यांनी पोलीस ठाणे मौजपुरीचे अधिकारी व अमलदार यांना वाळूची अवैद्य चोटी वाहतूक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.
त्या अनुषंगाने दिनांक 18/02/2025 रोजी व दिनांक 20/02/2025 रोजी अवैद्य वाळूची वाहतूक करणाऱ्या ईसमांनबाबत माहिती घेत असताना मौजे कवठा शिवारातील आणि मौजे घेटोळी शिवारातील दुधना नदीच्या पात्रात छापा मारला असता सदर ठिकाणी तीन महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टरला असलेल्या ट्रॉलीमध्ये काही ईसम अवैधपणे नदीपात्रातून वाळू उपसा करून तिची चोरटी वाहतूक करताना मिळून आले .नदीपात्रातून वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक व चालक 1) इरफान पाशा शेख रा. रांजणी ता. घनसावंगी जि. जालना 2) राजेश मंगल चव्हाण रा. पारधीवाडा ता. परतुर जि. जालना 3) संतोष दादाराव चव्हाण रा. पारधीवाडा ता.परतुर जि. जालना यांच्या ताब्यातून महिंद्रा सरपंच कंपनीचे विना क्रमांकाचे तीन ट्रॅक्टर वाळूने भरलेल्या तीन वेगवेगळ्या ट्रॉलीसह जप्त करण्यात आले असून नमूद गुन्ह्यामध्ये एकूण 15,13,000/. रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे मौजपुरी येथे कलम 303(2) भा.न्यां.स. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा.श्री. अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक जालना, श्री.आयुष नोपाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालना, श्री. दादाहरी चौरे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग परतुर यांची मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे मौजपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र वाघ ,रवींद्र बिरकायलू, दिलीप गोडबोले, राजेंद्र देशमुख, पोलीस अमलदार प्रशांत म्हस्के, डी. एल.वाघमारे ,प्रवीण पाचरणे अविनाश मांटे, होमगार्ड चाटे यांनी पार पाडली आहे.