आशाताई बच्छाव
राजमाता जिजाऊ वस्तीगृहात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड शहरातील नामांकित राजमाता जिजाऊ वस्तीगृहामध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.डी रेडिओलॉजिस्ट आद्या डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉ श्रीहरी बुडगेमवार, तर प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.कैलास पाटील चांडोळकर, ऍड.गोविंद पाटील डुमने, फिजिओथेरपिस्ट डॉ. ओमकार मांजरीकर, कवी साहित्यिक शिक्षक, संतोष तळेगावे सर,जाधव सर ,सचिन मेनकुदळे नारनाळीचे सरपंच भुजंग देवारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती .
प्रथमता सर्व मान्यवरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. राजमाता जिजाऊ वस्तीगृहाचे संचालक गंगाधर बिरादार सर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर भाषणे केली. उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांत निलेश फिरंगवाड, पांडुरंग वडेर, श्रीकांत वडजे,तिरुपती देवकते, निरंजन वडजे, व तसेच काही चिमुकल्या मुलींनी बहारदार अशी भाषणे केली. त्यामध्ये गार्गी बिरादार या मुलींने इंग्रजी मध्ये भाषण केले तर अमृता पांचारे या चिमुकलीने राजमुद्रा म्हणून त्याचे मराठीत अनुवाद करून सांगितले. गौरी पांचरे ने सुद्धा छान भाषण केले. या सर्व विद्यार्थ्यांच्या बहारदार भाषणानंतर सर्वत्र शिवमय वातावरण तयार झाले . यावेळी सुप्रसिद्ध कवी संतोष तळेगावे सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्कृष्ट असा पाळणा सादर केला व सर्वाच्या टाळ्यां मिळविल्या.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण करताना ॲड. गोविंदराव डुमणे पाटील म्हणाले की , आजच्या युगात तलवारीची गरज नसून खरी गरज ही पेन आणि पुस्तकाची आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या पातीवर स्वराज्य निर्माण केले .आजच्या युगातील विद्यार्थ्यांनी पेन आणि पुस्तक रुपी आयुधाचा वापर करून परिश्रमाने व ज्ञानाच्या जोरावर आधुनिक गडकिल्ल्याप्रमाणे,IAS, IPS, PSI, तहसीलदार , डॉक्टर , इंजिनियर , अभियंता ,न्यायाधीश, अशा महत्त्वाच्या पदावर गेलं पाहिजे.आई- वडिलांच्या कष्टाची, परिश्रमाची आठवण ठेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे असे प्रतिपादन डूमणे यांनी केले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ .बुडगेमवार सर आपल्या भाषणात म्हणाले की , शब्दही अपुरे पडती.. अशी शिवबाची कीर्ती ! राजा शोभूनी दिसे जगती. अवघ्या जगाचे शिवछत्रपती ! सर्वांनी स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणी माँसाहेब जिजाऊंनी थोर महापुरुषांच्या कथा सांगून शिकवण व प्रेरणा दिली. तीच आईची प्रेरना घेऊन शिवबांनी पुढे जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध, कौशल्याच्या बळावर , गनिमी काव्याने , बुद्धीचा चातुर्य दाखवून कठीण प्रसंगातून मार्ग काढला. त्यामुळेच शत्रू सैन्य बलाढ्य असून ही मुठभर मावळ्यांच्या एकजूटीने अनेक गडकिल्ले जिंकून विजय मिळविला. शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ ठरते. हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. शिक्षणामुळे आपले आयुष्य बदलू शकते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. नेहमी मोठे स्वप्न पहा आणि स्वप्नपूर्तीसाठी मेहनत व परिश्रम करा म्हणजे यश मिळेल असे प्रतिपादन डॉ. बुडगेमवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. अमुल्य वेळ देऊन उपस्थित राहिल्याबद्दल संचालक गंगाधर बिरादार यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वस्तीगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले होते. कार्यक्रमाचे सुंदर व बहारदार असे सुत्रसंचलन गंगाधर बिरादार सर यांनी केले.