आशाताई बच्छाव
ग्राहक पंचायत संघटनेच्या दिनदर्शिकेचे रापच्या विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव यांच्या हस्ते प्रकाशन
लातूर / प्रतिनिधी
ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी उर्फ नाना यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या व त्यांच्या प्रेरणेने निस्वार्थपणे, निष्कलंक, निश्चय कलंक, निःस्वार्थी पणाने, तन, मन लावून स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित होऊन ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ग्राहकांच्या हक्कासाठी व त्यांच्या हक्काची जाणीव जागृती करण्यासाठी, त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र गाव,वाडी, तांडा, वस्ती, शहर , तहसील, महानगरपालिका, नगरपरिषद, मोठ्या औद्योगिक शहरासह, ग्रामीण भागात सतत पायात भिंगरी, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, जिभेवर साखर ठेवून दिवस रात्र ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या संघटनेची दिनदर्शिका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, विभागीय लेखा अधिकारी अमित शाहूराज गंडाळे, विभागीय सांख्यिकी अधिकारी अतुल वळसंगकर, वरिष्ठ निरीक्षक अधिकारी व्यंकटराव बिरादार-पाटील नागलगावकर, अपघात विभागाचे वरिष्ठ अधिकारी शिवकुमार देशमुख, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जळकोट प्रतिनिधी व्यंकटेश बालासाहेब शिंदे अतनूरकर, घोणसीचे प्रतिनिधी शिवप्रसाद परगे, उदगीरचे प्रतिनिधी शिवा रायवाडे, तसेच वरिष्ठ लेखा अधिकारी, विभागीय यांत्रिकी, विभागीय सांख्यिकी अधिकारी, कर्मचारी, अपघात विभागाचे वरिष्ठ अधिकारी, राज्य परिवहन महामंडळाचे वाहक व चालक कर्मचारी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी, प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे यांनी दिनदर्शिकेतील विस्तृत माहिती आणि राष्ट्रांच्या सामाजिक, नैतिक उन्नती करता ज्यांनी योगदान दिले. अशा नेत्यांचा परिचय या दिनदर्शिकेत समावेश आहे. तसेच राज्यातील सर्व राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना सुरक्षित हमीची व सुखकर प्रवास संदर्भातील व महाराष्ट्र राज्य प्रवासी संघटनेची ही माहिती व सुरक्षित प्रवासा संदर्भातील विस्तृत माहितीही या दिनदर्शिकेत असून अशी उपयुक्त दिनदर्शिका ग्राहक पंचायत महाराष्ट्र मार्फत प्रकाशित करण्यात आली आहे. असेही जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी यावेळी सांगितली.