आशाताई बच्छाव
शिवजयंती समिती देगलूर च्या वतीने येरगी येथील सरपंच संतोष पाटील यांचा सत्कार.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी येथील सरपंच संतोष पाटील यांना नुकतेच प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील लाल किल्ल्यातील परेडसाठी निमंत्रित केले होते. त्यांना दिल्ली येथे पंचायत राज विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आले होते. यामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचा सन्मान देशपातळीवर झाला आहे. यासाठी काल आदर्श सरपंच संतोष पाटील यांचा सार्वजनिक शिवजयंती समिती देगलूर च्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी संतोष पाटील यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. याप्रसंगी आमदार जितेश अंतापूरकर, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मंगल पाटील, सर्व पदाधिकारी, मोगलाजी शिरशेटवार, लक्ष्मीकांत पदमवार, गट विकासअधिकारी शेखर देशमुख, मुख्यधिकारी चव्हाण सर, अंकुश देसाई , महेश पाटील, बालाजी पाटील, राजु पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.