आशाताई बच्छाव
आशिष शेळके यांच्या VIP OFFICE आणि VIP REAL ESTATE कार्यालयाचे थाटामाटात शुभारंभ.
आमदार भिमरावजी केराम व बेबीताई प्रदिपजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत रमाबाई शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
किनवट : शिवजन्मोत्सवच्या दिवशी आशिष शेळके यांनी त्यांचे संपर्क कार्यालय व्हिआयपी ऑफीस व व्हिआयपी रियल इस्टेट या कार्यालयाचे शुभारंभ अत्यंत थाटामाटात व हर्षोल्लास मध्ये केले. आमदार भिमरावजी केराम व बेबीताई प्रदिपजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आशिष शेळके यांच्या आई रमाबाई शेळके यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
आशिष शेळके यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, किनवट तालुक्यातील हे एकमेव रियल इस्टेट कार्यालय आहे, ज्यांना कुणाला किनवट तालुक्यात कुठेही घर, प्लाॅट, शेती इत्यादी खरेदी अथवा विक्री करायची असेल त्यांनी या व्हिआयपी कार्यालयाला अवश्य भेट द्यावे. किनवट तालुक्यातील कुठल्याही भागात, कुठल्याही नगर अथवा काॅलनी मध्ये घर, प्लाॅट, शेती खरेदी व विक्री चे सर्व कामे व्हिआयपी कार्यालय मध्ये केले जातील असे शेळके म्हणाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभानंतर लगेच भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. या कार्यक्रमास अनेक दिग्गज राजकीय नेते, विवीध पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार बांधव, वकील बांधव, पोलिस स्टाफ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.