आशाताई बच्छाव
एकलारा बानोदा येथे शंकर पटाच्या स्पर्धेत विजयी झालेल्या जोडी मालकांना चाळीस हजार रुपये बक्षीसाचे वाटप
स्वप्निल देशमुख
वरवट बकाल :– बजरंग दल व गावकरी मंडळी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने
एकलारा बानोदा येथे सुरेन्द्र ढगे यांच्या मळ्यात लेडी नदीच्या परिसरात
भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते
दिनांक 13 फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकविणाऱ्या बैलजोडी मालकांना भाजपा युवा मोर्चा जळगाव जामोद विधानसभा प्रमुख पवनअस्वार यांच्या पत्नी सौ प्रगतीताई अस्वार यांच्याकडून पंधरा हजार रुपयाचे बक्षीस द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या बैल जोडीला
एकलारा बानोदा येथील सरपंच सौ भारतीताई प्रवीण अस्वार यांच्याकडून 11000 रुपये तर तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या बैल जोडीला सौ .किरण सागर नांदोकार याच्याकडून सात हजार रुपये बक्षीस तर चतुर्थ क्रमांक पटकावणाऱ्या बैल जोडीला बजरंग दल एकलारा बानोदा यांच्यातर्फे 5000 चे बक्षीस ठेवण्यात आले होते
स्पर्धा पार पडल्यानंतर
विजय झालेल्यांना
पाहिले बक्षीस सौ प्रगतीताई पवन अस्वार द्वित्तीय बक्षीस एकलारा सरपंच सौ भारती प्रवीण अस्वार तुतीय बक्षीस सौ किरण सागर नांदोकार चतुर्थ बक्षीस बजरंग दल एकलारा यांच्या हस्ते अनुक्रमे
पातूरचे बैल मालक नाव गौरव जळमकार बैलाचे नाव जादू व संज्या
द्वितीय बक्षीस निवाना बैल मालक नाव दत्ता इंगळे बैल नाव राजा व बादशा
तुतीय बक्षीस वडगाव वाण बैल मालक नाव शुभम वाघ बैल नाव रुबाब व विराट चतुर्थ बक्षीस लाडनापूर शांताराम सोनोने बैलाचे नाव सर्जा व रॉकेट
यांना मान्यवराच्या हस्ते देण्यात आले यावेळी
पंच कमिटी किशन पवार,मंगेश वानेरे,विपुल अस्वार,निखिल नांदोकार,शुभम वानेरे,वैभव ढगे,, सर्वेश झगडे,रोशन बोबटकार,सचिन धुळे,विकास कोकाटे,आशिष नांदोकार,संदीप राऊत,विठ्ठल नांदोकर,ज्ञानेश्वर दामधर आधी शासन के गावकरी उपस्थित होते
या शंकरपाटाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथम द्वितीय आणि तृतीय ही तीनही बक्षीस महिला कडून देण्यात आलीआहे
हा शंकर पट पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते