आशाताई बच्छाव
सरस्वती कॉन्वेंट स्कूल
चिचाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव उत्साहात साजरा
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)आज दिनांक 19 फरवरी 2025 रोजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सरस्वती कॉन्व्हेन्ट स्कूल चिचाळ येथे राजे छत्रपती शिवाजी यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला . छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले. विद्यार्थी आणि शिक्षका वृंद यांनी महाराजांच्या प्रेरणादाई जीवन आणि विचार यांवर मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाला प्रा. नंदपुरे सर ,
राजविलास बोरकर , शिक्षीका मनिषा तलमले,अल्का शास्त्रकार, रंजू जिभकाटे ,भाग्यश्री घोडके, ऐश्वर्या काटेखाये आणि विद्यार्थि उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन रंजू प्रदिप जिभकाटे हिने मानले.