Home भंडारा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीत महात्मा फुलेंनाही अभिवादन करावे – पंकज वानखेडे

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीत महात्मा फुलेंनाही अभिवादन करावे – पंकज वानखेडे

34
0

आशाताई बच्छाव

1001254660.jpg

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीत महात्मा फुलेंनाही अभिवादन करावे – पंकज वानखेडे

 

शांतीवन बौद्ध विहार चिचाळ (अड्याळ) येथे “”घराघरात शिवजयंती मनामनात शिवजयंती

संजीव भांबोरे
(भंडारा जिल्हा प्रतिनिधी )पवनी तालुक्यातील
शांतीवन बौद्ध विहार चिचाळ / पाथरी (अड्याळ) येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोज बुधवार ला सकाळी 11:00 वाजता रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रसंगी शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार संजीव भांबोरे , प्रमुख पाहुणे ओ एस एस कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक संजय वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीत महात्मा फुलेंनाही अभिवादन करावे, असे सामाजिक कार्यकर्ते पंकज दिलीपराव वानखेडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी आपले मत व्यक्त केले.
रायगडावरील
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी क्रांतीसुर्य महात्मा फुलेंनी शोधून काढली. या देशात पहिली शिवजयंती उत्सव महात्मा फुलेंनी सुरू केला तर क्रांतीसुर्य महात्मा फुले हे शिव छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे जनक ठरतात. त्यामुळे महात्मा फुलेंच्या उत्तुंग कार्यकर्तृत्व आणि स्मृतींना उजाळा देण्यासाठी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचीही प्रतिमा ठेवून महाराजांसोबत क्रांती सूर्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावे. शिक्षकांनी शाळेत, इतरांनी आपले कार्यालय, बुद्ध विहारी, समाज मंदिरे, इत्यादी ठिकाणी आणि प्रत्येकाने आपापल्या घराघरात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमा ठेवून शिवजयंती साजरी करावी. शिक्षकांनी शिवजयंती उत्सवाचा खरा आणि वास्तव इतिहास विद्यार्थ्यांना समजून सांगावा. उद्याच्या पिढ्यापर्यंत जर खरा आणि वास्तव इतिहास पोहोचवायचा असेल तर त्यासाठी आधी आजच्या पिढीला तो समजणे अत्यावश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचा खरा इतिहास जतन व्हावा व सामान्य नागरिकांना कळवावा. क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या उत्तुंग कार्य कर्तुत्वाला व स्मृतींना उजाळा देण्यासाठी या वर्षी पासून घरा घरात शिवजयंती… मनामनात शिवजयंती या अभियानाला सुरुवात करावे , असे सामाजिक कार्यकर्ते पंकज वानखेडे यांच्या विचारातून व्यक्त झाले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक शालेय विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleवाशिम शहरात सुरु असलेल्या अवैध व अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करा
Next articleसरस्वती कॉन्वेंट स्कूल चिचाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here