आशाताई बच्छाव
ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशी
हभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे
ज्यांच्याकडे कन्यारत्न जन्माला आलेले आहे, त्याला कशाही कमी भासत नाही. म्हणतात ना पहिली बेटी और धन की पेटी… असा हितोपदेश हभप राहुल महाराज जोशी यांनी येथे बोलतांना दिला.
श्री. जोशी महाराज सहकार बँक कॉलनीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या भागवत कथेचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, पहिली बेटी ही खरोखरच धन की पेटी असते. मुलगी जन्माला आली की आपण बँक बँलन्स वाढवायला सुरुवात करतो. म्हणूनच म्हटले की, पहिली बेटी और धन की पेटी! श्रीकृष्ण जन्माचे गोडवे आज श्री. जोशी महाराजांनी गायिले. यावेळी त्यांनी पाळणा आणि भजनं देखील गायिले.
कीर्तन सेवेत आज हभप श्री राजेंद्र महाराज वाघमारे गोंदीकर यांनी जग्तगुरु संत तुकाराम महाराजांच्या अंभगावर निरुपन केले. भक्ती ते नमन । वैराग्य तो त्याग॥ ब्रम्ही भोग, ब्रम्हा तनु, देहाचे निरासने पाहिजे या ंठाया, माझी ऐसी काया॥ या अभंगावर निरुपन करतांना ते म्हणाले की, साधक भक्ती करतो, त्याच्या सेवेसाठी आहे म्हणून! भक्ती म्हणजे नमन! अर्थात भक्ती ही नम्रता आहे म्हणून ती सर्वश्रेष्ठ मानली आहे. संतांची दृष्टी सुध्दा अशीच होती. नम्रता हा भाव प्रत्येकांच्या ठायी- ठायी असावा, असेही ते म्हणाले.
यावेळी विश्वस्त मंडळचे सचिव श्री संपतराव पाटील, मंडळाचे इतर पदाधिकारी व कॉलनी सर्व भाविक उपस्थित होते.