आशाताई बच्छाव
साई चौकातील भाजी मार्केटचे नामकरण ‘लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट’
पुणे: ब्युरो चीफ उमेश पाटील
नवी सांगवीतील साई चौकातील भाजी मार्केटचे नामकरण दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या सन्मानार्थ करण्यात आले आहे.लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पाच वर्षांपूर्वी रस्त्यावर अनाधिकृतपणे भाजी विकणाऱ्या विक्रेत्यांना नवी सांगवी साई चौक येथे जागा मिळवून दिली होती.या उपक्रमामुळे शेकडो भाजी विक्रेते आज आनंदाने आपल्या व्यवसायाचा विकास करून आपल्या कुटुंबाचेही उदरनिर्वाह करीत आहेत.
म्हणून भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे यांनी लक्ष्मणभाऊंच्या उपकारांची आठवण म्हणून या भाजी मार्केटचे नामकरण ‘लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट’ असे करण्याचा निर्णय घेतला.
लक्ष्मणभाऊंच्या निधनानंतर विद्यमान आमदार शंकरभाऊ जगताप यांनी भाजी विक्रेत्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व मदत करीत आहे.
या नाम फलकाचे उद्घाटन आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि याच भाजी मार्केट मधील सुरज कांबळे सुजित कांबळे हे दोन सखे भाऊ महाराष्ट्र पोलीस मध्ये नुकतेच भरती झाले म्हणून त्यांचे शाल श्रीफळ देऊन आमदार शंकरभाऊ जगताप यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनाच्या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये महापौर माई ढोरे,नगरसेवक सागर आंघोळकर,संतोष कांबळे,महेश जगताप,नगरसेविका माधवी राजापुरे,उषा मुंडे,शारदा सोनवणे,प्रभाग अध्यक्षा शितल आगरखेड,वैशाली भरेकर,प्रसिद्ध गोल्डमॅन रमेश गाढवे आणि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर खैरे,पंकज सारसर,रमेश चौधरी आदींचा समावेश होता.
याशिवाय,कुणाल धिवार,रमेश डफळ,नितीन दोधाड,अरुण जाधव,संदीप पाटील,नितीन कांबळे,गणेश वाघमारे,वैभव कोळी,भरत कुमार,नावेद खान,नायडू अण्णा,श्रीरंग परतुले,अर्चना भनगे,संजना डोबके असे भाजी मार्केटचे पदाधिकारी आणि विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.