आशाताई बच्छाव
महाशिवराञी निम्मित अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड तालुक्यातील मौजे जाहुर येथे प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवराञी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे दि २१फेब्रुवारी ते २८फेब्रुवारी या कालावधीत जाहुर येथील सिध्देश्वर महादेव मंदीरात सपंन्न होणार आहे
पहाटे४ते६काकडा आरती, सकाळी ८ते १०शिवलीलाअमृत पारायण, सकाळी १०ते १२गाथा भजन , दुपारी २ते ५ यावेळेत श्री.ह.भ.प.दादाराव महाराज राऊत यांच्या वाणीतुन भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
सांयकाळी ६ते ७ हरीपाठ ,राञी ९ते११हरिकिर्तन राञी ११ते ४ हरीजागर होणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी सिध्देश्वर मंदीरात नंदीमुर्ती स्थापना सोहळा होईल.
२१ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.एकनाथ महाराज
वंडगीरकर ,२२फेब्रुवारी रोजी ह.भ.प.एकनाथ महाराज पाळेकर ,२३फेब्रुवारी रोजी ह.भ.प.निवृती महाराज रावीकर ,२४फेब्रुवारी रोजी ह.भ.प.नवनाथ महाराज डोंगरशेळकीकर,२५ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.बाबु महाराज काकंडीकर,२६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. मनोहर महाराज आळंदीकर, २७फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता अग्णीकुंड होईल. तर सायकांळी ह.भ.प. माऊली महाराज जाहुरकर यांचे किर्तन होणार आहे..२८फेब्रुवारी रोजी ह.भ.प. मनोहर महाराज वसुरकर यांचे सकाळी १०ते १२वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे व नतंर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. व दुपारी २ वाजता जंगी कुस्त्यांचा सामना होणार आहे. या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील जनतेने लाभ असे आवाहन गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.