आशाताई बच्छाव
चाळीसगाव एमआयडी भागात अनोळखीचा मृतदेह आढळला
चाळीसगाव प्रतिनिधी, विजय पाटील- शहराला लागून असलेल्या खडकी बुद्रूक शिवारात र्औद्योगिक वसाहत परिसरात कत्तलखाना बांधकामाच्या बाजुला आज मंगळवार दि.18 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या पूर्वी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या अनोळखी इसमाचे वय अदंाजे 40 ते 45 वर्षे असून या इसमाचा घातपात झाला की अन्य कारणाने मृत्यु झाला हे समजून आले नाही. याप्रकरणी खडकीच्या पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान मृत इसमाच्या डोळ्यावर इजा झाल्याचे दिसून येत आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरणकुमार कबाडी.उपनिरीक्षक संदीप घुले यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली. चाळीसगाव शहर पोलीसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. तपास उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत.