आशाताई बच्छाव
कन्नड घाटात कार दरीत कोसळून दोघांचा मृत्यू – 2 गंभीर
चाळीसगांव प्रतिनिधी विजय पाटील- राष्ट्रीय महामार्ग क्र 211 वरील चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाट उतरत असताना कार खोल दरीत कोसळून एकाचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि 15 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली होती उपचारादरम्यान एका जखमीचा मृत्यू झाला आहे.
याबाबत माहिती अशी की एम.एच. 19
डी. व्ही. 9289 ही कार कन्नड घाट उतरत असताना वळणावर खोल दरीत कोसळून कार मधील मुकेश राजेंद्र महाजन (36 रा. नाशिक) यांचा जागीच
मृत्यू झाला तर कार मधील टाकळी प्र.चा. येथील रहिवाशी विजय रघुनाथ महाजन, जितेंद्र राजेंद्र महाजन, दिपक बोराडे रा न्हावी ता यावल हे गंभीर जखमी झाले होते.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष पाटील, शशिकांत पाटील, महेंद्र अहिरराव, संदिप जगताप, योगेश पवार, अनिन तडवी, सतिष हलनोर, संदिप पाटील व चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, हवालदार संदीप पाटील, नंदलाल परदेशी, मनोज पाटील, सचिन वाघ यांच्यासह कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून मृतदेह व जखमींना खोल दरीतून बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात रवाना केले.
उपचार सुरु असताना जखमी असलेले जितेंद्र राजेंद्र महाजन यांचा मृत्यू झाला आहे. तर विजय रघुनाथ महाजन यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.