आशाताई बच्छाव
फक्त पदाचा निरोप दिला आहे कर्तव्य चालूच राहणार
उपसभापती प्रदीप वाघ यांचे भावनिक मनोगत
कार्यकाळ संपल्याने पंचायत समिती कडून निरोप समारंभ
पालघर :सौरभ कामडी
आज पंचायत समितीचा उपसभापती म्हणून कार्यकाळ संपतो आहे मात्र हा फक्त पदाचा कालावधी संपत आहे मात्र ज्या मुळे या पदावर होतो ती आपल्या लोकांची कामे करण्याचे कर्तव्य सुरूच राहणार आहे यामुळे अधिकार जरी संपले असतील मात्र कर्तव्य बजावत राहायचे आहे आज पहिल्यांदा काय बोलावे ते सुचत नसुन भावनिक झालो आहे. मात्र माझ्या आजवरच्या कार्यकाळात पंचायत समिती मोखाडा मधील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी खूप सहकार्य केले. तसेच सरपंच उपसरपंच यांनी सुद्धा वेळोवेळी मदत केली यामुळे मी यशस्वीरीत्या हा कार्यकाळ पूर्ण करू शकतो असे भावनिक मनोगत माजी उपसभापती प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.
जिल्हयातील पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्याने यासर्व सदस्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम पंचायत समिती प्रशासनाकडून घेण्यात आला. यावेळी सभापती युवराज गिरंधले यांनी आपल्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा देत. पदावर असताना येथील लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला मला सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी आभार देखील मानले यावेळी माजी उपसभापती लक्ष्मी भुसारा, अनिता पाटील, आशा झुगरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती मधील सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होतेच या शिवाय शिक्षक समन्वय समिती चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी एकात्मिक बालविकास अधिकारि, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक यांनी सहृदयी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी सभापती युवराज गिरंधले यांच्या संकल्पनेतून पंचायत समितीच्या प्रथमदर्शनी भागावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी पहिल्यांदाच असा भव्य दिव्य निरोप समारंभ झाल्याचे बोलले जात आहे.