आशाताई बच्छाव
येवता येथे शिवश्री सुदर्शन आबासाहेब शिंदे यांच्या शिवचरित्रावर आधारित व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 16/02/2025
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील येवता येथे दिनांक 15 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता संपन्न झाले. सुरुवातीला येवता येथील आयोजक शिवप्रतिष्ठान उत्सव समिती आणि शिवश्री सुदर्शन शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शिवश्री सुदर्शन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानतंर बोलतांना शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवण कशी आहे.ते आपल्या बोलण्यातून सांगितले. त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे देत पटवून दिले. छत्रपति शिवाजी महाराज यांच्या राज्यात स्री ला खूप महान मानत असत. मॉ. जिजाऊंनी शिवबा घडविला तसेच आता माझ्या बहिणींनी आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन मुलांना चांगले शिक्षण द्यावे. शिवबा सारखे संस्कार आपल्या मुलांना द्यावे असे सुचविले.वाईट व्यासंनाकडे मुलांनी जाऊ नये असे ते म्हणाले.तरुण मुलांनी आणि मुलींनी आपल्या आई वडील यांची मान खाली जाणार याची काळजी घ्या असे आवाहन त्यांनी बोलतांना केले. कार्यक्रमाला येवता व परिसरातील महिला आणि पुरुष तसेच नव तरुण मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिव प्रतिष्ठान उत्सव समिती येवता यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली. त्यामुळे ऊपस्थीत नागरिकांनी त्यांचे आभार मानले.