आशाताई बच्छाव
अखिल भारतीय शिंपी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे होणार- राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)अखिल भारतीय शिंपी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन लवकरच नागपूर येथे घेण्यात येणार आहे. त्या अधिवेशनाबाबत माहीती देण्याकरीता अखिल भारतीय नामदेव क्षेत्रिय महासंघ नवी दिल्ली चे नवनिर्वाचित अध्यक्ष भास्करराव टोम्पे यांचे दिनांक 13 जानेवारी 2025 ला आगमन भंडारा येथे झाले .त्यानिमित्त शिंपी समाज भंडारा तर्फे त्यांचे स्वागत श्री.राजू मनगटे अध्यक्ष वैष्णव शिंपी समाज भंडारा यांनी केले . महासंघाचे समन्वयक श्री.अनंतराव जागंजोड यांचे स्वागत नंदकिशोर क्षीरसागर यांनी केले,विदर्भ शिंपी समाज मंडळाचे अध्यक्ष श्री.राजुभाऊ किटे यांचे स्वागत भास्करराव किटे यांनी केले. तसेच केशवराव हूड यांचे स्वागत स्वप्नील डहाके यांनी केले. सभेत शिंपी समाजातील पोटजातींना एकत्र आणून त्यांच्या सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.नुकत्याच महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या “श्री.संत नामदेव महाराज “समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळाच्या ध्येय धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली महामंडळाच्या माध्यमातून शिंपी समाजाचा विकास साधण्यासाठी पुढील दिशा निर्देश आगामी नागपूर अधिवेशनात ठरविण्यात येणार आहेत. पाहुण्याचे स्वागत महिला कार्यकारिणी मंडळाच्या अध्यक्षा सौ.स्मिताताई किटे,उपाध्यक्षा सौ.साधनाताई मनगटे,मार्गदर्शक सौ.संध्याताई गंधे,मंगलाताई किटे,सौ.क्षीरसागर,सौ.घडोलेयांनी केले सभेला भंडारा शिंपी समाजातील बंधू भगिनीनी मोठया संख्येनी संत नामदेव महाराज स्मारक जवळ,शास्त्री चौक भंडारा येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली कार्यक्रमाचे संचालन प्रदिपभाऊ गंधे यांनी केले तर सभेचे समारोप भास्करराव किटे यांनी करून सभा स॔पन्न झाली.
.