आशाताई बच्छाव
आपली प्रगती कशात आहे ते शोधा आणि राष्ट्राच्या प्रवाहात जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या : अॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचे प्रतिपादन. जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ
शैक्षणिक जिवनात अभ्यास करीत असतांना प्रत्येकाने आपली प्रगती कशात आहे हे शोधले पाहिजे आणि राष्ट्राच्या प्रवाहात काम करीत असतांना जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या, जातीय सलोखा राखा तरच देशाची प्रगती आहे आणि ही प्रगती करण्याची ताकद राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे असे प्रतिपादन महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक अॅड. ब्रम्हनंद चव्हाण यांनी केले आहे.
जालना तालुक्यातील इंदेवाडी येथे महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 7 दिवसीय शिबीराचे उद्घाटन गुरुवार दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडले. यावेळी ते बोलत होते. या शिबीराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. प्रसाद मदन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार वनंजे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सोमीनाथ खाडे, बद्रीनाथ गोंगे, सरपंच लक्ष्मी सर्जेराव शिंदे, उप सरपंच गिरीजाबाई नामदे, सदस्य सुमित वाघमारे, सिरसाट यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना अॅड. ब्रम्हनंद चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे देश घडविणारे असतात. त्यांनी जात, धर्म, पंथ या पलिकडे जावून जावून प्रत्येक समाजाला आणि समाजातल्या प्रत्येकाला राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे हवे-हवेसे वाटले पाहिजेत, त्या दिशेने वाटचाल करा असे आवाहन अॅड. चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी संघर्ष करुन एक समतोल शिक्षण व्यवस्था आणि दर्जेदार शिक्षण व्यवस्था उपलब्ध करुन देत त्या माध्यमातनू उत्कृष्ठ विद्यार्थी घडविल्याचेही सांगीतले.