आशाताई बच्छाव
चाळीसगावात आज केकी मूस स्मारकाचा लोकार्पण सोहळा..
14 प्रेमी युगुलांचाही सत्कार…
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगावासारख्या ठिकाणी आयुष्याची 50 वर्ष प्रेयसीची वाट पाहत घराचा उंबरठा न ओलांडणारे, तीनशेहून अधिक सुवर्णपदकं मिळवली व आपल्या अनेक छायाचित्रांना, कलाकृतींना त्या दगडी हवेलीत बंदिस्त राहून जन्म दिला.अशा थोर विश्वविख्यात छायाचित्रकार कलामहर्षी केकी मूस यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार 14 फेबुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान आवार, जुना मालेगाव रोड चाळीसगाव येथे आयोजीत करण्यात आला आहे.
यावेळी सुशोभित स्मारकाचे लोकार्पण होणार असून यशस्वी सहजीवन जगणार्या 14 प्रेमी युुगुलांचा सत्कार तसेच प्रतिष्ठान परिसरातील विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठानचे अध्यक्ष भिकनराव गायकवाड असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा दूध संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण व शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. या महान कलाकाराने प्रेमात चाळीसगावमध्ये ’मूस आर्ट गॅलरी’ निर्माण केली. त्यांनी टेबलटॉपसाठी वापरलेल्या सगळ्या चीजवस्तू अजूनही चाळीसगावच्या केकी मूस कलादालनात आहेत. जवळजवळ त्यांच्या 1500 कलाकृतींची कल्पक मांडणी या कलादालनात केलेली आहे