आशाताई बच्छाव
मोखाड्यामध्ये दीपक फाऊंडेशन व दीपक नायट्रेट मार्फत संगाथ प्रकल्प प्रसार कार्यशाळा संपन्न
पालघर :सौरभ कामडी
मोखाडा तालुक्यात दीपक फाऊंडेशन व दीपक नायट्रेट मार्फत राबवण्यात येणाऱ्या संगाथ प्रकल्प प्रसार कार्यशाळेचे गुरुवार दिनांक १३/०२/२०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे . सुरेश कामडी सर (नायब तहसीलदार,मोखाडा) उपस्थित होते. तसेच .अभयकुमार टकले(नायब तहसीलदार,मोखाडा),.अक्षय पगार गटविकास अधिकारी, पंचायत समिती मोखाडा मधुकर गवळी(सह्हायक गटविकास अधिकारी,पंचायत समिती मोखाडा),.योगेश कोरडे(मंडळ अधिकारी,मोखाडा).रामनाथ गोडे (कृषी अधिकारी, पंचायत समिती मोखाडा),डॉ.किशोर देसले(आरोग्य अधिकारी,मोऱ्हांडा आणि दीपक फाऊंडेशनचे उपसंचालक आकाशकुमार लाल सर,बिमल व्यास आणि कामिल वाघेला हे हि उपस्थित होते.याच बरोबर मोखाडा तालुक्यातील सर्व तलाठी, कृषी सहाय्यक आणि १७ ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच , सदस्य ,रोजगार सेवक व दीपक फाऊंडेशन मोखाडा येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यशाळे दरम्यान संस्थेचे उपसंचालक .आकाशकुमार लाल यांनी दीपक फाऊंडेशन व त्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. तसेच श्री कामिल वाघेला कार्यक्रम व्यवस्थापक,दीपक फाऊंडेशन यांनी मोखाडा तालुक्यात संगाथ प्रकल्प अंतर्गत मागील ३ वर्षात विविध शासकीय योजनांन मार्फत केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली.त्यानंतर श्रीमती. सुवर्णा पाटील (ICDS supervisor) , तलाठी .शरद बिन्नर आणि सरपंच .नरेंद्र येले यांनी दीपक फाऊंडेशन मार्फत चालू असलेल्या कार्याबद्दल कौतुकास्पद मनोगत व्यक्त केले.
दीपक फाऊंडेशन व दीपक नायट्रेट मार्फत संगाथ प्रकल्पा अंतर्गत राबवण्यात आलेल्या मागील ३ वर्षातील केलेल्या कार्याची दखल घेऊन “तहसील कार्यालय मोखाडा मार्फत दीपक फाऊंडेशन मोखाडा यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले”. या नंतर दीपक फाऊंडेशनचे . बिमल व्यास सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.