Home पालघर रयत शिक्षण संस्थेच्या आदिवासी हायस्कूल पोशेरा येथे शनिवारी दहावीचा शुभचिंतन सोहळा संपन्न...

रयत शिक्षण संस्थेच्या आदिवासी हायस्कूल पोशेरा येथे शनिवारी दहावीचा शुभचिंतन सोहळा संपन्न झाला

25
0

आशाताई बच्छाव

1001223125.jpg

रयत शिक्षण संस्थेच्या आदिवासी हायस्कूल पोशेरा येथे शनिवारी दहावीचा शुभचिंतन सोहळा संपन्न झाला पालघर :सौरभ कामडी  *************************या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन मा.पांडुरंग बाळू नवले हे होते. या कार्यक्रमासाठी पोशेरा गावचे सरपंच मा.मनोहर नवले,स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मा.देवराम पाटील , मा.रामचंद्र बदादे, मा.मच्छिंद्रनाथ बदादे,मा.कुणाल काशीद, मा.प्रभाकर शेवाळे, मा.काशिनाथ कचरे,मा.चिंतामण बदादे, मा . पंडित खादे पोशेरा केंद्र शाळेचे मुख्याध्यापक मा.मांगात सर, मा.निरगुडे सर, मा.लिलके सर हे उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख मा.पाटील सर यांनीही सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मा.कापडणीस सर यांनी केले. त्याचबरोबर मा.मच्छिंद्र बदादे, मा.लिलके सर, मा.निरगुडे सर, मा.कुणाल काशीद, मा.जयराम वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.मा.जयराम वाघ यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम तीन क्रमांकासाठी रोख बक्षीसे त्याचबरोबर आपल्या हॉटेल कणसरी वरती जेवणाचे निमंत्रण दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवीची विद्यार्थिनी दीक्षा पाटील हीने केले.तीचे कौतुक रोख बक्षीस देऊन मा.जयराम वाघ यांनी केले.आभार प्रदर्शन वर्गशिक्षक जुनघरे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनवणे सर, शेख सर, .कडू मॅडम, जाधव सर . मधुकर नवले यांनी मेहनत घेतली.सर्वांना भोजनाची सोय करण्यात आलेली होती भोजन झाल्यानंतर कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

Previous articleकुतूहलातून विविध विषयांवरील साहित्याची निर्मिती राज्यस्तरीय साहित्य संमेलनात डॉ. अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन
Next article13 फेब्रुवारीला आमला विश्वेश्वर येथे रंगणार लाल मातीतील कुस्तीची दंगल.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here