आशाताई बच्छाव
मराठवाडा शिक्षक संघाच्या धरणे आंदोलनाचा परिणाम. परिक्षक व नियामक शिक्षकांच्या मानधनात वाढ. जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 08/ 02/2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक वउच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालया समोर दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी विविध मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये प्रामुख्याने मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी नियुक्त केलेले परिक्षक व वरिष्ठ परिक्षक तसेच नियामक आणि वरिष्ठ नियामक यांच्या मानधनात फेब्रुवारी/ मार्च२०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परिक्षांसाठी नियुक्त शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय दि१०जानेवारी व २१जानेवारी रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या सहविचार सभेमध्ये घेण्यात आला यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, मार्गदर्शक निवृत मुख्याध्यापक डी जी तांदळे, डॉ पुरुषोत्तम जुन्ने, छत्रपती संभाजीनगर सचिव चंद्रकांत भाई चव्हाण, मार्गदर्शक डॉ उमाकांत राठोड, जालना जिल्हा सचिव संजय येळवंते, कार्याध्यक्ष फरखुंद अली सय्यद, जाफ्राबाद तालुकाध्यक्ष सुधाकर डोईफोडे, सचिव बी टी लंके, भागवत काकडे, अजित बारहाते, संजय चव्हाण, शेख जावेद, खलील शेख हे व इत्यादी बहाद्दर शिलेदार व कार्यकर्ते उपस्थित होते